पिंपरी – अगोदरच बॅंकेत गहाण ठेवलेल्या फ्लॅटची दोन जणांना विक्री करुन फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. मझर युसूफ शेख (वय-39 रा. श्रीराम पार्क, कामगारनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष चंद्रकांत राऊत (वय-39 रा. जाधववाडी), चंद्रकांत गोपाळ राऊत (वय-68), तारामती चंद्रकांत राऊत (वय-64) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मझर शेख यांनी संतोष यांच्याकडून पिंपरी येथील फ्लॅट 43 लाख 60 हजार रुपयांना विकत घेतला होता. मात्र, हा फ्लॅट अगोदरच भारत बॅंकेकडे गहाण होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मझर यांच्या नावे कॉर्पोरेशन बॅंकेतून पुन्हा कर्ज घेतले व आरोपींनी हे कर्ज फेडण्याची ग्वाही दिली होती. त्यांनतर दि. 14 मार्च 2015 रोजी हा फ्लॅट राऊत यांनी मझर यांच्या नावे केला. मात्र, आरोपींनी संगणमत करुन घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरलेच नाहीत. यानंतर आरोपी चंद्रकांत याने मझर यांच्या नावे असलेल्या फ्लॅटची महाराजा अलगरसामी यांना परस्पर विकला.