पुणे(प्रतिनिधी) – मॅक्डोनाल्ड कंपनीची फ्रेंचाईस मिळवून देण्याच्या नावाखाली एकाची साडेआठ लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीविरुध्द खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी नामदेव तुकाराम भापकर(47,रा.खडकी) यांना एका व्यक्तीने फोन करुन मॅक्डोनाल्ड कंपनीची फ्रेंचाईस मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी फ्रेंचाईस रक्कम म्हणून त्यांना आठ दिवसाच्या कालावधीत विविध कारणाने 8 लाख 55 हजार रुपये बॅंक खात्यांमध्ये ऑन लाईन पध्दतीने भरण्यास भाग पाडले होते. पैसे भरल्यानंतर मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची फ्रेंचाईस देण्यात आली नाही. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पठाण करत आहेत.