पिंपरी – दुसऱ्याच्या नावे असलेल्या जमिनीचे खोटे नकाशे व चुकीच्या चतु:सिमा खऱ्या आहेत, असे दाखवून कोर्टात कागदपत्रे सादर करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेमंत कांतीलाल साठे (वय-44 रा. शारदा कॉलनी, पिंपळे निखल) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरविंद नारायण साठे (रा. वाक वस्ती, पिंपळे निलख) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत यांच्या आई-वडीलांच्या नावे असलेली सिटी सर्व्हे नं. 723, 724, 725, 726, 727, 728, 731, 732 अशा सर्व्हे नं. 64 मधील जमिनीचे खोटे व बनावट नकाशे तयार करुन त्यावर खोट्या व चुकीच्या चतु:सिमा दाखवून ही कागदपत्रे अप्पर तहसीलदारांच्या कार्यालयातील मामलेदार कोर्टात सादर केली व दावा दाखल केला. हेमंत यांच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या हेतूने ही खोटी कागदपत्रे दाखवून शासन व त्यांची फसवणूक केली आहे.