पिंपरी -“ओएलएक्स’ साईडवर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून दुचाकी खरेदी करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. दुचाकी खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर ठरलेली रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करुनही गाडी न देता एकाची 80 हजार रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार सांगवी येथे घडला आहे.
याप्रकरणी नैनी राजू (वय-25, रा. पिंपळे सौदागर) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7253943551, पेटीएमनंबर 8306328995 व 8426814226 या मोबाईल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने “ओएलएक्स’ या खरेदी-विक्री साईडवर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली. त्यानुसार फिर्यादीने आरोपींच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून दुचाकी खरेदी करण्याची इच्छा व्यक्तकेली. त्यानुसार दोघांमध्ये दुचाकीचा व्यवहार 79 हजार 200 रुपये ठरला. त्यानुसार ही रक्कम फिर्यादीने पेटीएमवर ट्रान्सफर केली. मात्र, त्याला दुचाकी न देता फसवणूक केली.