पुणे – ग्रामविकास विभागाचे बनावट होमपेज तयार करून त्यावर नोकर भरतीची खोटी जाहिरात देऊन तरूणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. यावरून बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संदीप कोहिणकर (वय ३५, रा. शनिवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. कोहिणकर हे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर तीन हजार पेक्षा अधिक पदांची भरती होणार असल्याची जाहिरात व्हायरल होत आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. हे अर्ज केवळ ऑनलाईन भरता येत असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क घेतले जात होते.