भाडे करारातील ट्रॉली विकून फसवणूक

सातारा  – भाडेपट्टयावर ट्रॉली घेऊन एकाने त्या ट्रॉली विकल्याची घटना समोर आली. त्यातून साडेतीन लाखांचा फसवणूक केल्याची तक्रार नामदेव अर्जुन सुतार (वय 76, रा. निगडी वंदन, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी किसन ज्ञानदेव शेळके (रा. टाकरवन, ता. देवराई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नामदेव सुतार यांनी 2010 मध्ये दोन लाख रुपये किंमतीचा संगम स्टील वर्क्‍स कंपनीचा चार चाकी ट्रेलर (ट्रॉली) मुलगा अरविंद याच्या नावावर विकत घेतला होता.

निगडी वंदनमध्ये तसेच शेजारच्या गावात किसन शेळके हा ऊस तोड टोळ्या घेऊन गेले आठ ते दहा वर्षांपासून येत होता. शेळके याने हे ट्रेलर दरमहा दहा हजार रुपये भाड्याने मागितले. त्यानंतर त्याने ठरल्यानुसार चार महिने भाडे दिले. मात्र, त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सुतार त्याच्या गावी गेले असता तो गावात सापडला नाही. तेव्हा त्याच्या शेजारच्या लोकांनी किसन शेळके याने ट्रॉली विकल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर सुतार यांनी त्यांच्या मालकीच्या दोन लाखांच्या ट्रॉली फसवणूक करून विकल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.