पॅरिस – मंगळवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीने आज जोरदार श्रीमुखात भडकावली. मॅक्रॉन हे आग्नेय फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला.
अध्यक्षांना श्रीमुखात लगावणाऱ्या या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब ताब्यात घेतले. लोखंडी कुंपणाच्या पलिकडून हा हल्लेखोर गर्दीोमध्ये मिसळला होता. यासंदर्भात दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
एका माणसाने अध्यक्षांना मारण्याचा प्रयत्न केला. याक्षणी आमच्याकडे पुढील काही प्रतिक्रिया नाही, असे अधिकाऱ्यानी म्हटले आहे.
गर्दीशी हातमिळवणीसह चर्चेची देवाणघेवाण पुन्हा सुरू झाली. त्यानंतर अध्यक्षांचा दौरा पुन्हा सुरू राहिला आहे,असे फ्रेंच अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या एलिसीने एका निवेदनात म्हटले आहे.