फ्रान्समध्ये बंदुकधाऱ्याकडून तीन पोलिसांची हत्या

पॅरिस – पॅरिस शहराच्या पे- डे-डोम भागात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या हल्ल्यात तीन पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणी हस्तक्षेप करत असताना या व्यक्‍तीने पोलिसांवरच गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये चौथा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. बंदुकधाऱ्याने एका महिलेला ओलीस ठेवले होते. तिची सुटका करण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांवर हा गोळीबार झाला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलीस या प्रकरणी एका घरी गेले असताना हा प्रकार घडला.

बंदुकधारी व्यक्‍तीने सर्वप्रथम एका पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर आणखी एकाला जखमी केले आणि घराला आग लावून दिली. या बंदुकधाऱ्याला रोखण्यासाठी आणखी दोन पोलीस पुढे आले असता त्यांनाही या बंदुकधाऱ्याने गोळ्या घातल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेला मोठा धक्का बसला असून हल्लेखोराच्या शोधासाठी मोठा फौजफाटा पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.