पॅरीस – फ्रांस सरकारने लसीकरण झालेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आपल्या देशात प्रवेश करण्यास अनुमती दिली आहे. बुधवार पासून हे पर्यटक आता फ्रांसमध्ये येऊ शकतात असे त्या देशाच्या सरकारने म्हटले आहे.
फ्रांसच्या पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. लसीकरण झालेल्या प्रवाशांना फ्रांसमध्ये आल्यानंतर आता क्वारंटाईन राहावे लागणार नाही. फ्रांस भेटीसाठीचे कारणही त्या प्रवाशांना द्यावे लागणार नाही.
लसीकरण झालेल्या युरोपियन प्रवाशांना फ्रांसमधील आगमनानंतर तेथे कोणतेही टेस्टींग करण्याची गरज नाही. काही देशांसाठी अजूनही अलीकडे करण्यात आलेली करोना चाचणी प्रमाणपत्र मात्र तेथे द्यावे लागेल. तथापि परदेशी पर्यटकांना बहुतांश तेथे पुन्हा खुले प्रवेश दिले जात आहेत. त्या आधारे आपल्या देशातला पर्यटन व्यवसाय पुन्हा बहरेल असा विश्वास फ्रांस सरकारला वाटत आहे.