भारतीय किनारपट्टी भागात फ्रान्स गुंतवणूक करणार

पणजी – भारतातील किनारपट्ट्यांवर पर्यटन आणि इतर उद्योग विकसित करण्यास मोठा वाव आहे. यासाठी फ्रान्समधील उद्योग गुंतवणूक करू इच्छित आहेत. याबाबतच्या शक्‍यता आजमावण्यासाठी गोवा येथे फ्रान्स सरकारने एका गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे.

फ्रान्सच्या वतीने असा प्रस्ताव गोव्याच्या राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारची परिषद आगामी काळातही घेण्याची इच्छा फ्रान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचित केली आहे भारताला मोठी किनारपट्टी लाभली आहे.
याठिकाणी पर्यटनाबरोबरच आयात निर्यातीवर आधारित इतर उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतात. फ्रा

न्स येथील कंपन्यांनी भारतातील कंपन्यांना या कामी सहकार्य करावे. गुंतवणूकदार याकामी गुंतवणुकीद्वारे मदत करू शकतात, असे गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोव्यात आणि लगतच्या भागात फ्रान्समधील कंपन्या गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.