फ्रान्सच्या विजयाचे शिल्पकार : दिदिएर डेसचॅम्प्स

“वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो..गोल खुद ब खुद हो जाएगा… ‘ चक दे इंडिया फिल्म मधला या फेमस डायलॉगची गेल्या आठवड्यात पुन्हा आठवण आली. कारण “चक दे इंडिया’ सारखंच थोड्या फार फरकाने फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डेसचॅम्प्स यांच्या बाबतीत घडलं. डेसचॅम्प्स यांनी एक खेळाडू म्हणून याआधी 1998 साली विश्वचषक जिंकला होता आणि आता प्रशिक्षक म्हणून फ्रान्सला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून दिला. फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवून फुटबॉल विश्वचषक 2018 आपल्या नावे केला. याचे खरे शिल्पकार ठरले ते दिदिएर डेसचॅम्प्स.

फ्रान्सने 20 वर्षानंतर विश्वचषक आपल्या नावे केला. यापूर्वी फ्रान्सने 1998 मध्ये ब्राझीलला नमवत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. 1998 आणि 2018 या दोन्ही विश्वचषकाचा एक साक्षीदार आहे ते म्हणजे दिदिएर डेसचॅम्प्स. त्यांनी 1998 मध्ये कर्णधार म्हणून आपल्या टीमची धुरा सांभाळली तर प्रशिक्षक म्हणून “आम्ही आत्मविश्वासाच्या बळावर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला” असे डेसचॅम्प्स यांनी स्पष्ट केले” त्यामुळे त्याच्या या आत्मविश्वासाला सलाम!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिदिएर डेसचॅम्प्स म्हणतात, “वीस वर्षांपूर्वी फ्रान्सने मिळवलेल्या विजयाच्या माझ्या स्मृती या विजयामुळे ताज्या झाल्या आहेत. तो विजय तर फ्रान्समध्ये मिळवलेला असल्याने तिथेदेखील असाच जल्लोष झाला होता. त्या संघात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून असल्याने त्याच्या स्मृती तर माझ्या मनात चिरंतन राहणारच आहेत. मात्र हा विजयदेखील त्या विजयाइतकाच मोठा आणि अफलातून आहे.” अर्जेटिनावर 4-3 ने मिळवलेला विजय आणि त्यात एम्बापेने केलेले अफलातून गोल यामुळे संघाच्या वाटचालीला गतीसह आत्मविश्वासाचे कवच लाभले. त्यानंतर उरुग्वे आणि बेल्जियमवरील विजय आमच्यासाठी सर्वाधिक मोलाचे ठरले. तिथून आम्ही विश्वविजेते बनण्याच्या आशा बळावल्या, असेही ते म्हणाले.

डेसचॅम्प्स यांनी फ्रान्सच्या दुसऱ्या विश्वविजेतेपदाबरोबरच एक दुर्मिळ बहुमानही मिळविला आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्‍वचषक जिंकणारे ते इतिहासातील केवळ तिसरी व्यक्‍ती ठरले आहेत. ब्राझीलचे मारियो झागालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकनबावर या दोघांनी हा मान मिळविला आहे. याआधी 1998 मध्ये पॅरिसमध्ये ब्राझिलविरुद्ध 3-0 ने विजय मिळवणाऱ्या फ्रान्स संघाचे डेसचॅम्प्स कर्णधार होते.

– संदीप कापडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)