फॉक्‍सकॉन भारतात आयफोनचे उत्पादन घेणार

नवी दिल्ली  -जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्‍ट मॅन्युफॅक्‍चरिक कंपनी फॉक्‍सकॉन लवकरच भारतात मोठ्या प्रमाणात आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. फॉक्‍सकॉन सर्वाधिक ऍपलच्या हॅन्डसेटचे उत्पादन करते. अनेक दिवसांपासून चीनमध्ये आयफोन तयार करण्यावर भर राहिल्याचे फॉक्‍सकॉन टेक्‍नॉलॉजीचे अध्यक्ष टेरी गो यांनी म्हटले.

कंपनी आगामी काळात नवीन योजना तयार करणार आहे. मागील काही वर्षांपासून बेंगळूरमध्ये जुन्या फोनचे उत्पादन करत आहे. परंतु आता नवीन आयफोनची निर्मिती करणार असल्याचे गो यांनी सांगितले आहे. स्थानिक उत्पादन करत नसल्याने भारतात आयफोन महाग आहेत. तर भारतात उत्पादन घेण्यासा सुरुवात झाल्यावर आयफोन स्वस्त होत त्यांना आयात कर भरावा लागणार नाही. 2018 मध्ये 17 लाख आयफोनची विक्री झाली आहे. फॉक्‍सकॉन नवीन आयफोनचे उत्पादन चालू महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. चेन्नईच्या बाहेर हा प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.