चंदगडमध्ये चौरंगी लढत; अपक्ष उमेदवारांनी फोडला मातब्बरांना घाम

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्ष या तिघांच्या प्रमुख लढती असल्या तरी एका अपक्ष उमेदवाराने या मातब्बर उमेदवारांना अक्षरश: घाम फोडला आहे.

महाराष्ट्रातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघ. या मतदार संघात दुर्गम भाग येतो. याच ठिकाणातील अनेक लोक हे कामानिमित्त मुंबईत किंवा मेट्रो सिटी असतात. या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संध्यादेवी कुपेकर या विजयी झाल्या होत्या. तत्पूर्वी कित्येक वर्ष बाबासाहेब कुपेकर यांनी या चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. या निवडणुकीत मात्र संध्यादेवी कुपेकर यांनी जाहीर माघार घेत नवख्या उमेदवाराला संधी द्यावी असे स्पष्ट केलं. त्यामुळं यंदा कोण आमदार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खरंतर या मतदार संघात 16 उमेदवार उभे आहेत.

प्रमुख लढती :

राजेश पाटील – राष्ट्रवादी
संग्रामसिंह कुपेकर – शिवसेना
अशोक चराटी-जनसुराज्य शक्ती
शिवाजी पाटील – अपक्ष (भाजपा पदाधिकारी)

आता निवडणुकीची रणधुमाळी रंगात आल्यामुळे सर्वांनीच प्रचाराला सुरुवात केली आहे राष्ट्रवादीकडून राजेश पाटील यांना संधी मिळाल्यामुळे त्यांनी जोरदार प्रचार करत गाव आणि वाड्या-वस्त्या पिंजून काढले आहेत. तर राजेश पाटील यांचे मेहुणे हे शिवसेनेचे खासदार असल्यामुळे इथं मेव्हण्याचे राजकारण त्यांच्या मदतीला येईल का?

तर शिवसेनेची उमेदवारी ही संग्रामसिंह कुपेकर यांना मिळाली आहे. ते राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे पुतणे आहेत त्यांनीही प्रचारात गती घेतली आहे परंतु याच मतदारसंघात भाजपचे धडाडीचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे निकटवर्तीय यांनी समजले जाणारे शिवाजी पाटील यांनी अपक्ष उभं राहून बंडखोरी केलीय. एवढेच नव्हे तर शिवाजी पाटील यांनी आपल्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या सर्व नेत्यांचे फोटो वापरले आहेत याच अपक्ष उमेदवाराने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना चांगलाच घाम फोडला आहे. तसंच भाजपची पूर्ण ताकत ही अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील असल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे जनसुराज्य शक्ती पक्षाने अशोक सराटी यांना उमेदवारी दिली आहे अशोक सराटी हे मूळचे लिंगायत समाजाचे असल्यामुळे आणि या विधानसभा मतदारसंघात जवळपास 30 हजारपेक्षा अधिक मतदार हे लिंगायत समाजाचे असल्यामुळे याचा फायदा ओळखून जनसुराज्य शक्ती पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे ते देखील या मतदारसंघात जोरदार प्रचार करताना पाहायला मिळतात परंतु या मतदारसंघात जातीय समीकरण चालणार नसून माझ्या वैयक्तिक केलेल्या कामामुळे मला लोक मत देतील असं सराटी यांनी म्हटले.

चंदगड विधानसभा मतदारसंघ जरी दुर्गम असला आणि खेडोपाडी तरी मोठ्या प्रमाणात असली तरी देखील इथं मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे या चौरंगी लढतीमध्ये कोण नवा आमदार होतो हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)