बारामतीकरांना दिलासा! कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील 14 जण निगेटिव्ह

म्हाडा कॉलनीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील 14 जण निगेटिव्ह

बारामती – शहरातील म्हाडा कॉलनीतील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून शहरातील रुग्णांची संख्या 7 झाली आहे. इतर दोघांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत.

भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न राबून देखील शहरातील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बारामती शहरातील श्रीराम नगर ,समर्थ नगर तसेच म्हाडा कॉलनी परिसरात कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले.

बारामती शहरातील 7 जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. श्रमिक नगर येथील रिक्षा चालक शहरातील पहिला कोरोना रुग्ण ठरला . त्यानंतर समर्थ नगर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना ची लागण झाली. तसेच म्हाडा कॉलनीतील 77 वर्षीय संक्रमित असल्याचे आढळले . बारामती शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बारामती शहरात कोरोना आला कसा हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

शहरातील म्हाडा कॉलनीतील एका औषध दुकानात कार्यरत कर्मचा-याच्या 77 वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या जवळच्या 14 नातेवाईकांना पुणे येथील औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे शहरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 7 एवढी झाली आहे. समर्थ नगर येथील कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यानंतर सहा दिवसात शहरात एकही नवीन रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला होता मात्र म्हाडा कॉलनीतील 77 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली . त्यामुळे शहरातील कोरोनचा धोका वाढला आहे.

जे व्यक्ती रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेले आहेत त त्यांनी सिल्वर जुबली हॉस्पिटल येतील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपली नावे गोपनीय ठेवण्यात येतील यामुळे करून वायरसचा संसर्ग व त्याची साखळी तोडण्यास खूप मोलाची मदत होईल .सर्वजण घरामध्ये रहा आपणास अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यास आपण सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.