राजस्थानातील बस अपघातात चौदा ठार

बिकानेर: राजस्थानातील एका बस अपघातात चौदा जण ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. बिकानेर जिल्ह्यात डुंगरगड येथे सोमवारी सकाळी बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. त्यावेळी ही बस जयपुरहून बिकानेरला चालली होती. पाच जण जागीच ठार झाले तर अन्य गंभीर जखमींचे रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

सुरूवातीला यात दहा जण ठार झाल्याचे सांगण्यात आले होते पण पोलिसांनी मृतांचा आकडा चौदा असल्याचे म्हटले आहे. 22 जखमींवर पीबीएम सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी जादा वैद्यकीय पथक तिकडे पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी किती जण गंभीर आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.