चार वर्षांनी ऍपलने सॅमसंगला टाकले मागे

पुणे – ऍपल आयफोन 12 मालिका हिट ठरली आहे. तब्बल चार वर्षांनी स्मार्टफोन बाजारात सॅमसंगला ऍपलने मागे टाकले आहे. त्यामुळे ऍपलचा दबदबा वाढला आहे. ऍपलने सॅमसंग आणि इतर कंपन्यांना नमवून नंबर 1 स्मार्टफोन विक्रेत्याचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

 गार्टनर अहवालानुसार, 2020 च्या चौथ्या तिमाहीत ऍपलने सॅमसंगपेक्षा अधिक फोनची विक्री केली. 2016 नंतर प्रथमच ऍपलने एक नंबरी स्मार्टफोन कंपनीचे बिरुद पटकावले. एका रिपोर्टनुसार, 2020 च्या चौथ्या तिमाहीत ऍपलने 7.9 कोटी आयफोनची विक्री केली, तर सॅमसंगची एकूण स्मार्टफोनची विक्री 6.29 कोटी होती. 

या काळात स्मार्टफोन बाजारात ऍपलचा वाटा 20.8 टक्‍के होता तर सॅमसंगचा वाटा 16.2 टक्‍के होता. या अहवालानुसार, सॅमसंग अव्वल स्थानावर होता, परंतु ऍपलने आयफोन 12 च्या विक्रमी विक्रीने सॅमसंगकडून नंबर 1 चा मुकुट हिसकावून घेतला आहे. ऍपलने आयफोन 12 मिनी, आयफोन 12, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्‍ससह आयफोन 12 मालिकेअंतर्गत चार आयफोन आणले आहेत. सर्व फोनमध्ये 5 जी सपोर्ट देण्यात आला आहे. 

यापैकी, आयफोन 12 मिनी सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान फोन आहे. आयफोन 12 मालिकेच्या कोणत्याही फोनप्रमाणेच आपल्याला बॉक्‍समध्ये चार्जर आणि इयरफोन मिळणार नाहीत, मात्र आपल्याला निश्‍चितपणे चार्जिंग केबल मिळेल जे टाइप-सी टू लाइटनिंग आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.