कोल्हापूर : कोल्हापूर च्या इचलकरंजी शहरातील कोले मळा परिसरातील एका 60 वर्षीय नागरिकाचा कोरूना पॉझिटिव आल्यानंतर त्याच्या चार वर्षाच्या नातवाचाही आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल कोरोनाबाथीताच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना कालच तपासणीसाठी शासनाच्या आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले होते.
त्याठिकाणी घरातील सर्वांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रात्री उशिरा त्यातील काही रिपोर्ट आले. यामध्ये एका 15 वर्षाच्या नातवाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर चार वर्षाच्या नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कालच्या बाधित पत्नीचा व त्यांच्या घरातील अन्य दोघांचा रिपोर्ट येणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.