बसथांब्यासमोरच चारचाकी वाहनांचे अतिक्रमण 

“अनधिकृत वाहनांवर कारवाई करा’

बसथांब्यासमोर सतत चारचाकी लावल्याने प्रवासी व इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाहनांमुळे कित्येकदा बसथांबत नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी बसथांब्यासमोरील अनधिकृत वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी शांताराम डोईफोडे या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. 

पुणे – शहरातील पुणे स्टेशन ते रास्ता पेठ दरम्यान असलेल्या बसथांब्यासमोर अनधिकृत चारचाकी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पीएमपीएमएल बसमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांना अडथळा निर्माण होत असून अपघाताचीही शक्‍यता निर्माण झाली आहे.
पुणे स्टेशन, रास्ता पेठ, नवी पेठ या मार्गावर शाळा व मोठ-मोठ्या सोसायट्या असल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या गर्दी असते. तसेच, या ठिकाणी के.ई.एम हॉस्पिटल असल्याने रुग्णवाहिकांची सतत ये-जा असते.

या मार्गावरून स्टेशन ते स्वारगेट दरम्यान बस जात असल्याने प्रवाशांची मोठ्या वर्दळ असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी बसथांब्याचा आसरा घ्यावा लागतो. मात्र, थांब्यासमोरच अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना बस आलेली दिसत नाही. यामुळे पावसात उभे राहून प्रवाशांना बसची वाट पाहत उभे रहावे लागते. तसेच, बसथांब्यासमोर वाहनांचे अतिक्रमण होत असल्याने बसचालकांनाही रस्त्यातच बस उभी करावी लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.