सातारा – दिल्ली निज्जामुद्दीन येथील तबलिगी कार्यक्रमामधून आलेले सातारा जिल्ह्यातील दोन नागरिक, परदेश प्रवास करुन आलेला २० वर्षे वयाचा युवक अशा तिघांना करोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.तसेच नेपाळवरुन प्रवास करुन आलेल्या ४८ वर्षाच्या महिलेला संशयित म्हणून कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्यातील ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये संशयित म्हणून दाखल असलेल्या ४८ वर्षीय महिलोचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.