कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो – अजित पवार

बारामती -राजकीय जीवनात काम करताना शरद पवार साहेब यांच्यामुळे चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होता आले. पवार साहेब चारवेळा मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच म्हणलं आपण देखील चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणूनच कसे होईना मी देखील चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झालो, अशी मिश्‍किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केली. पवार यांच्या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माळेगाव कारखान्याचे सभासद व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन शहरातील रयत भवन येथे करण्यात आले होते. मेळाव्यास मार्गदर्शन करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.