नवी दिल्ली : डेअरी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने, चार हजार पाचशे 58 कोटींच्या योजनेस बुधवारी मंजुरी दिली. या योजनेमुळे सुमारे 95 लाख शेतकर्यांना फायदा होणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल पत्रकारांना माहिती देताना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, ही योजना ‘श्वेत क्रांती’ला अधिक उंच स्थरावर नेईल.
प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळाने व्याज सबवेशन योजनेंतर्गत मिळणारा लाभ 2% वरून 2.5% करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयाचे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.