काश्‍मिरात चार दहशतवाद्यांचा खात्मा

हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरही ः एकास जिवंत पकडण्यात यश
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये जवानांनाच्या हाती मोठे यश आले आहे. अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

यात हिजबुल मुहाहिद्‌दीनच्या कमांडरसह लष्कर-ए-तोयबाच्याही दहशतवाद्यांचा समावेश आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत्या एका दहशतवाद्यास पकडण्यात आज जवानांना यश आले. काश्‍मीरच्या सोपोर भागात जवानांनी ही कारवाई केली.

हिजबुल मुजाहिद्‌दीनचा कमांडर गुलजार अहमद भट, मुजफ्फर अहमद भट, उमर अमीन भट आणि सजाद अहमद भट अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्वजण कुलगाम जिल्हयातील असल्याची प्राथमिक माहिती समजते.

जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दियलगाम भागात दहशदवादी दडून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रविवारी पहाटे परिसरात शोध मोहीम सुरु केली होती. दरम्यान, परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांनावर गोळीबार सुरू केला.

प्रत्त्युतरात जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. एसओजी, 164- सीआरपीएफ आणि 19-आरआर या तुकड्यांच्या जवानांनी मिळून ही संयुक्त मोहीम राबवली आहे.
चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके 47 रायफल, दोन पिस्तूल, दारुगोळा आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या दहशतवाद्यांचा अनेक गुन्ह्यांत सहभाग होता.
प्राप्त माहितीनुसार अनंतनागमधील चकमकीत हिजबुलचा कमांडर आणि लश्‍कर ए तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या अगोदर शोपिया जिल्ह्यातील खाजपुरा रेबन भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.