जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान 

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाला चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. शौकत अहमद, अहमद खांडे, सुहैल युसूफ आणि रफी हसन मीर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. ते कोणत्या संघटनेचे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दक्षिण काश्मीरातील शोपियाच्या दारमदोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांचा माग काढताना दहशवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देऊन सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, शनिवारपासून या भागात चकमक सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)