नवी दिल्ली : दिल्लीच्या सीलमपूर भागातील जुनी चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#UPDATE Delhi: Four-storey building collapses in Seelampur, several feared trapped. Rescue operation underway. https://t.co/4BxnExaQ0C pic.twitter.com/zrCg9B4POl
— ANI (@ANI) September 2, 2019
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य चालू केले. इमारतीखाली अनेक रहिवासी अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरूच होते. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य सहा जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.