बाजारपेठेतील चार दुकाने फोडली

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घटनेमुळे खळबळ
कामशेतमध्ये शटर उचकटून चोरी : फुटेज पोलिसांच्या हाती

चोरीच्या घटनांत वाढ
कामशेतमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता आणि एकाच दिवशी बाजार पेठेतील तीन दुकानांमध्ये चोरी झाली. या चोरांना पोलीस प्रशासन कधी पकडणार तसेच पाच कॅमेरे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते बंद असल्याचा आरोप करीत बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून बसवलेले कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी व्यापारी असोसिएशन, दुकानदार व कामशेतकर नागरिक करीत आहेत.

कामशेत – कामशेत येथील मुख्य बाजार पेठेतील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेली चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केली आहे. यातील तीन दुकानांमध्ये आज, शुक्रवारी (दि. 19) पहाटे चोरी झाली. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्ताबाबत नागरिक, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. या प्रकरणी खुशाल पंचमलाल प्रजापती (वय 24, रा. कामशेत) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 19) पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास कामशेत शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फोडली. विशेष म्हणजे चोरी झालेली एक दुकान कामेशत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. एका दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी चोरी केली. तर अन्य तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी झाली.

फिर्याद खुशाल प्रजापती यांचे खुशाल इलेक्‍ट्रॉनिक आणि मोबाईल शॉपी याचे शटर उचकटून गल्ल्यातील 20 हजार रुपयांची रोख रक्‍कम चोरली आहे. तर मनोज शांतीलाल गदिया यांचे प्रवीण प्रोव्हिजन स्टोअर्स, पारस परमार यांचे ओम नमो इलेक्‍ट्रोनिक्‍समधील दोन एलईडी टीव्ही, महाराष्ट्र मेडिकल या दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली. शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली आहे. कामशेत पोलिसांना दुकानदारांच्या सीसीटीव्ही कॅमेरात संशयित चोरट्यांचे फुटेज कैद
झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.