पुणे – उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी पुण्याच्या चार खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा 7 ते 10 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
हनाज अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अश्वैत जाधव (33 किलोखालील), पराग कांबळे (37 किलोखालील), श्रीनिधी काटकर (65 किलोखालील) यांना मुलांच्या गटात प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे तर मुलींमध्ये श्रुतिका टकले (41 किलोखालील) हिची निवड झाली आहे.
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सोनकुल व क्रीडा संघटक राहुल कुदळेयांचे मार्गदर्शन मिळत आहे. पुण्याच्या या खेळाडूंनी जॉर्डनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगले यश मिळविले होते.