चार देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा “क’ दर्जा

राजगुरूनगर – नायफड-वाशेरे जिल्हा परिषद गटातील 4 देवस्थानला तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा “क’ दर्जा मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी दिली.

खेड तालुक्‍यातील औढे येथील श्री कोळोबा देवस्थान, आव्हाट येथील श्री आनंदीआई देवस्थान, आंबोली येथील श्री बापदेव देवस्थान व खरोशी येथील श्री शंकर देवस्थान या चार देवस्थानला पर्यटनाचा “क’ वर्ग तर तीर्थक्षेत्राचा मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा देवस्थान, वसुली येथील श्री भामचंद्र डोंगर, शिरोली येथील श्री जाखमाता देवी यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होता.

जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दिल्यानंतर या भागाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या सर्व देवस्थानसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये टप्प्याटप्प्याने खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.