सातारा – चिंचनेर वंदन (ता. सातारा) येथील विवाहितेला पती, सासरा, सासू, नंदावा या सर्वांनी संगनमताने मारहाण केली. माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक, मानसिक त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. वैशाली विजय धुमाळ (वय 33 रा. चिंचनेर वंदन) यांनी तक्रार दिली आहे.
वैशाली धुमाळ आणि त्यांचा नंदावा शरद मुरलीधर साबळे (रा. शिवथर, ता. सातारा) यांच्यात वाद झाला. ही बाब वैशाली यांनी सासरे दुर्योधन खाशाबा धुमाळ व सासू सावित्री यांना सांगितली. त्यानंतर तिचा पती विजय दुर्योधन धुमाळसह सासू, सासरे, नंदावा यांनी संगनमत करुन तिचा शारीरीक, मानसिक छळ सुरु केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. माहेरहून वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, असेही सांगितले. हा सर्व प्रकार 2004 ते 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासरे, सासू व नंदावा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.