पुणे – बहिणीला त्रास देत असल्याचा जाब विचारत, चौघा मेहुण्यांनी दाजीला बदडले. तसेच, त्यांच्या दुकानातील काचा आणि साहित्याची तोडफोड केली. ही घटना खडीमशीन येथील एन. एम. ग्लास दुकानात घडली.
नईम एहमद सईद (36, रा. कोंढवा खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाकीर नासीर, याकूब नासीर, रागीव नासीर आणि अजूब नासीर यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीचे चारही आरोपी हे मेहुणे आहेत. त्यांनी 2 डिसेंबर रोजी दुकानात घेऊन फिर्यादीला बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारला. फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीबरोबर काही दिवसांपूर्वी घरगुती वाद झाले होते. याची माहिती त्यांच्या मेहुण्यांना मिळाली होती. यातूनच चौघाही मेहुण्यांनी त्यांना मारहाण केली. यानंतर दुकानातील काचा आणि इतर साहित्याचे नुकसान केले.