कोलकाता – सध्याची कोविडची स्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मधील चार महापालिकांच्या निवडणूका तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या आहेत. या निवडणुका आता 12 फेब्रुवारीला होणार आहेत.
आधीच्या कार्यक्रमानुसार त्या 22 जानेवारीला होणार होंत्या. सिलिगुडी महापालिका, चंदेरनगर महापालिका, विधाननगर महापालिका, आणि असनसोल महापालिका अशा चार महापालिकांचा कार्यक्रम बदलण्यात आला आहे.
या बदलाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कलकत्ता हायकोर्टानेही या निवडणुका चार ते सहा आठवडे पुढे ढकलता येतील काय याचा विचार करावा अशी सुचना राज्य निवडणूक आयोगाला केली होती. या निवडणुकाच काही काळापुरत्या रद्द करण्याची मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी केली होती. पण या निवडणुका रद्द करण्यास तृणमुल कॉंग्रेसचा विरोध होता.