चार मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार मोटार वाहन निरीक्षकांच्या गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या जागी नवीन चार निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार वाहन निरीक्षक रुपेश गायकवाड, रघुनाथ कन्हेरकर, मारोती पाटील, प्रविण आवाड यांची बदली करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी वाशी येथील वासुदेव एकनाथ भगत, पुणे येथून भालचंद्र अनंत कुलकर्णी, अकलूज येथून पोपट पाटील तर, जालन्यातून सोनाली पोतदार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.