नवी दिल्ली- सीबीआयचे माजी संचालक राकेश आस्थाना यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपाची चार महिन्यात चौकशी पुर्ण करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे. या प्रकरणात मुदत वाढ मिळावी अशी मागणी करणारा अर्ज सीबीआयने केला होता. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सीबीआयने त्यांना तेवढाच वेळ मागितला होता.
आस्थाना यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्या कडून कोट्यावधी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआय मध्ये काहीकाळापुर्वी वरीष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप झाल्याने सीबीआय या देशातील सर्वोच्च तपास संस्थेची चांगलीच शोभा झाली होती.