साडेचार लाखांचा गांजा जप्त

कामशेतमध्ये ग्रामीण पोलिसांची कारवाई
 
कोट्यवधींची उलाढाल
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग पसरले आहेत. यामुळे तेथे राज्यासह परराज्यातील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या कामगारांमध्ये दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी गांजाचे सेवन करण्याची “क्रेझ’ आहे. त्यामुळे गांजाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे. यामुळे चोरी-छुप्या पध्दतीने गांजाची विक्री ग्रामीण भागातील उद्योगांचे जाळे असलेल्या परिसरात केली जात आहे. या बाजारपेठेत गांजा विक्रीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावल्यास यातून काळबाजार उघडकीस येईल, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

पुणे – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कामशेत येथे छापा टाकून 30 किलो गांजा जप्त केला. गांजाबरोबरच इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा, असा 4 लाख 51 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कामशेत येथील दौंडे कॉलनी येथे करण्यात आली. महेंद्र शांतीलाल भन्साळी (50, रा. दौंडे कॉलनी, कामशेत), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मावळ तालुक्‍यात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना भन्साळी याने बेकायदा गांजा बाळगला असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकला असता नायलॉनच्या पांढऱ्या पोत्यात 30 किलो गांजा आढळून आला.

गांजा विकण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि वजन काटाही आढळून आला. त्याच्याविरुध्द अंमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्‌माकर घनवट, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघमारे, अजय दरेकर, समीर शेख, गणेश महाडिक, वैभव सपकाळ, संदीप शिंदे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.