चिंचवडमध्ये चार मेडिकल चोरट्यांनी फोडली

पिंपरी – दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी चार मेडिकलची दुकाने फोडली. ही घटना बुधवारी (दि. १) पहाटे चिंचवड येथे घडली. संचारबंदीच्या काळात चोरट्यांचा मुक्त संचार असल्याचे यावरून दिसून येते. सन्मती मेडिकल, महावीर मेडिकल, रिव्हायवल मेडिकल आणि आणखी एक दुकान (नाव समजू शकले नाही) अशी फोडलेल्या दुकानांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चिंचवड गावातील चार औषधाची दुकाने फोडली. शेवटचे रिव्हायवल हे या दुकानाचे शटर उचकटत असताना समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने चोरट्यांना हटकले. यामुळे चोरटे दुचाकीवरून पळून गेले.

सध्या फक्त किराणा माल आणि औषधाची दुकाने सुरू आहेत. म्हणूनच चोरट्यांनी मेडिकलच्या दुकानांना लक्ष्य केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.