चार लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी, विदेशी दारू नष्ट करून 22 जणांना अटक

नगर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या आचारसंहितेमध्ये रामनवमी व डॉ.आंबेडकर जयंती या कालावधीत 22 गुन्हे दाखल करून 17 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख 97 हजार 727 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विभागीय उपआयुक्‍त अर्जून ओव्होळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांचे आदेशानुसार नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघात रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि. 11 ते 14 एप्रिल 2019 या कालावधीत 22 गुन्हे दाखल केले असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गावठी दारु 160 लिटर, कच्चे रसायन 3 हजार 590 लिटर, देशी दारु 126.60 लिटर, विदेशी दारु 56.25 लिटर, बिअर 46.08 लिटर व एक चार चाकी व एक दुचाकी वाहने असे 3 लाख 97 हजार 727 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

लोकसभा निवडणुकीनिमित्त मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल. या विभागामार्फत अनुज्ञप्तीचे सखोल निरीक्षण केले असता 24 अनुज्ञप्तीमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांच्याविरुध्द विभागीय प्रकरण नोंदविण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. लोकसभा मतदार संघात या विभागामार्फत दि.21 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपासून दि. 22 व दि.23 एप्रिलपर्यंत मतदानाचा संपूर्ण दिवस तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघात दि.27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपासून दि. 28 व दि. 29 मतदानाचा दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री (कोरडा दिवस) बंदचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. आचारसंहिता कालावधीत सात भरारी पथके तयार करण्यात आली असून या पथकांमार्फत गुन्हा अन्वेषणचे कामकाज केले जात आहे. या पथकात नगर विभागाचे निरीक्षक, निरीक्षक ब विभाग, निरीक्षक श्रीरामपूर, निरीक्षक कोपरगाव, निरीक्षक संगमनेर, निरीक्षक भरारी पथक क्र. व निरीक्षक भरारी पथक क्र. 2 मध्ये सर्व कर्मचारी यांचा सहभाग आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.