नांदेड – नांदेडमध्ये गुरुवारी झालेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी पावसात चार तालुक्यांतील गावांमध्ये एका शेतमजूर महिलेसह तीन शेतकरी वीज कोसळून ठार झाले आहेत. या घटनेत सहा जण जखमी झाले असून पाच जनावरेही दगावली आहेत.
जिजाबाई गव्हाणे, कपिल कदम, रामकिशन चिखले आणि किशन भिसे अशी विज कोसळून ठार झालेल्यांची नावे आहेत. या दुर्घटना हदगाव, हिमायतनगर, नायगाव आणि किनवट तालुक्यात घडल्या. या विविध ठिकाणी विज कोसळून अन्य सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.