मुंबई-पुणे एक्‍सप्रेसवरील अपघातात 4 ठार 

खोपोली मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे वर खोपोलीजवळ आज भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि आर्टिका कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे वर पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या आर्टिका कारने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यापैकी दोन जणांना एमजीएम, तर एकाला लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

मुंबईकडून आर्टिका कारने तीन प्रवाशी पुण्याच्या दिशेने निघाले होते. खालापूर हद्दीतील फुडमॉल येथे कारचालक भरधाव असताना चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात चालकासह दोन प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही अपघात दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडले आहेत. अपघातानंतर पुणेकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तर अपघातस्थळी पोलीस व मदतनीस दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या दोन जणांना पनवेल येथे एमजीएमला तर एकाला लोकमान्य रुग्णालयात हलविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.