करोनाचा उद्रेक! दिल्लीत कोविडग्रस्तांसाठी चारशे नवीन ICU बेड्‌स

नवी दिल्ली – दिल्लीत पुन्हा करोना रूग्ण वाढू लागल्याने शहरात आयसीयु बेड्‌स वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून गेल्या काही दिवसांत दिल्लीत चारशे नवीन आयसीयु बेड्‌स उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. ते म्हणाले की शहरातील विविध रूग्णालयांमध्ये एकूण 1650 आयसीयु बेड्‌स उपलब्ध करून देण्यात येत असून हे चारशे बेड त्या योजनेचाच भाग आहेत.

दिल्लीतील सर्व खासगी रूग्णालयांनी कोविड रूग्णांसाठी 50 टक्‍क्‍यांऐवजी 60 टक्के नॉन आयसीयु बेड्‌स राखीव ठेवाव्यात असा आदेशही केजरीवाल सरकारने जारी केला आहे. तसेच दिल्लीतील 42 खासगी रूग्णालयांनी त्यांच्या एकूण आयसीयु बेड्‌स पैकी 80 टक्के आयसीयु बेड्‌स कोविड रूग्णांसाठी आरक्षित ठेवावेत असा आदेशही त्यांना देण्यात आला आहे.

करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्याही अचानक वाढू लागल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते. हा प्रकार टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची सूचना आपण महापालिका अधिकाऱ्यांना केली आहे असेही जैन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.