पाचवड रोडवर वडाचे झाड पडल्याने चार तास वाहतूक ठप्प

वाई – वाई शहरासह  तालुक्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने सुरवात केली. वाई- पाचवड रस्त्यावर वाकेश्वर परिसरात वडाचे झाड दुपारी तीनच्या सुमारास पडल्याने चार तास वाहतूक ठप्प झाली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद असली तरी महत्वाच्या गाड्याची ये-जा सुरु असते.  माहिती मिळताच उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, शाखा अभियंता नयन शेलार यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन वडाचे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
सध्या सुगीचे दिवस असून शेतात ज्वारी, गहू असल्यामुळे अचानक पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एका एक पाऊस आल्याने  अनेकांची तारांबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.