बारामतीत चार तासच अत्यावश्‍यक सेवा

जळोची – करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बारामती शहर गुरुवार (दि. 16) ते गुरुवार (दि.23) पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या कळात सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत केवळ अत्यावश्‍यक वस्तू व सेवा पुरवणारी दुकाने खुली असणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

प्रतिबंधित क्षेत्रात वयोवृद्ध, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले यांच्यासह मधुमेह, रक्‍तदाब, दमा आधी आजार असणाऱ्या व्यक्‍तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा दुकाने व सर्व किरकोळ व ठोक विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत.

…यांना मुभा
शासकीय कर्मचारी, न्यायपालिका कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, डॉक्‍टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, डिजिटल मीडियाचे कर्मचारी, फार्मा, संबंधित मेडिकल दुकानाचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्‍यक सेवा ज्यात कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा, आरोग्य अधिकारी कर्मचारी, महावितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस, महसूल, नगरपालिका कर्मचारी यांना मुभा आहे.

..हे पूर्णपणे बंद
मटण, चिकन, अंडी, मासे विक्री दि. 16 ते 19 पर्यंत पूर्णपणे बंद आहेत. दि. 20 ते 23 दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरू असतील. सर्व किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे आडत, भाजी मार्केट, फळविक्रेते, आठवडे व दैनिक बाजार, फेरीवाले व कृषी उत्पन्न बाजार समिती (दि.19) पर्यंत पूर्णपणे बंद, तर दि. 20 ते 23 दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरू असतील. सर्व सलून, ब्युटी पार्लर, स्पा यासह हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, बार, मार्केट, मॉल हे (दि.23) पर्यंत पूर्णतः बंद असतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.