बुलढाणा जिल्ह्यात आईसह चार मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात एका विहिरीत आईसह चार मुलींचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माळेगावात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की, हत्या हे अद्याप उघड झाले नाही दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मेहेकर तालुक्‍यातील माळेगाव परिसरात असलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. हे वृत्त गावात धडकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, विहिरीत आढळलेले पाच मृतदेह एका आईसह चार मुलींचे आहे. त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आई उज्वला ढोके, मुलगी वैष्णवी ढोके, दुर्गा ढोके, आरुषी ढोके, पल्लवी ढोके अशी मृतांची नावे आहेत. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले जाणार आहेत. पोलिसांनी घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)