विमान अपघातात चार फुटबॉलपटू ठार

खेळाडूंना करोना झाला होता

रिओ द जानेरिओ – ब्राझिल मध्ये झालेल्या एका विमान अपघातात एका क्‍लबच्या चार फुटबॉलपटुंचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. हे फुटबॉलपटू पलमास क्‍लबचे होते. तथापि त्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे विमानाने दुसरीकडे हलवले जात असताना हा अपघात झाला. क्‍लबच्या अध्यक्षांचाही मृतांमध्ये समावेश आहे. ब्राझिलच्या उत्तरेकडील तोकॅन्टीस प्रांतात उड्डाणाच्यावेळी हे विमान कोसळले.

या खेळाडूंना करोना झाल्यामुळे त्यांना अन्य खेळाडूंपासून दूर ठेवण्यात आले होते व त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्थाही त्यांच्या टीमपासून वेगळी ठेवण्यात आली होती. येत्या रविवारी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना टीमच्या अन्य खेळाडूंसमवेत प्रवासाची अनुमती दिली जाणार होती. पण त्याच्या आतच त्यांच्यावर काळाने हा घाला घातला. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे अजून स्पष्ट झालेले नाही.

विमान कोसळल्यानंतर त्याला लगेच मोठी आग लागली. आगीत हे विमान पुर्ण जळून खाक झाले आहे. हे विमान सहा आसनी क्षमतेचे होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.