पालघर – मोखाडा तालुक्यतीाल ब्राह्मणगाव येथे रात्री एका घाराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी जीव धोक्यात घालत या घराची खिडकी तोडून आत अडकलेल्या दोन मुलांची सुटका केली.
अनंत मौळे यांच्या घरात किराणा मालचे दुकान आहडे. त्यात त्यांच्यासह त्यांची पत्नी द्वारकबाई, आई गंगाबाई आणि चार मुलांसह ते राहतात. अनंता शेजारच्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास घराला आग लागली. त्यात त्यांची पत्नी, आई आणि दोन मुले मरण पावली. शेजाऱ्यांनी खिडकीत तोडून घरात जाऊन दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर नाशिक आणि मोखाडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या कुटुंबियांना वाचवण्याच्या प्रयत्नात अनंत यांच्या डोक्याला दुखापत झालीआहे.
मोखाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ते शवविच्छेदन अहवालाची वाट पहात आहेत. दरम्यान शेजाऱ्यांनी ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र पालघरचे वीज वितरणचे अधिक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मते, ही आग शेजारच्या केरोसिनच्या दुकानापासून सुरू झाली असावी. याचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. याबाबात आम्ही मोखाडाच्या तहसीलदारांशी समन्वय साधून आहोत, असे त्यांनी सांगितले.