भारत सरकारने कोविन पोर्टलमध्ये एक नवीन सुरक्षा फिचर जोडले आहे. आता वापरकर्त्याने लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर त्याला चार अंकी सुरक्षा कोड मिळेल. या कोडचा उपयोग लसीकरणाच्या वेळी आरोग्य सेवकास दाखविण्यासाठी केला जाईल. हे लसीकरण केलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंदवेल.
कोविन पोर्टलचे नवीन फिचर हे सुनिश्चित करेल की, ज्यांनी लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केली आहे त्यांची योग्य व संपूर्ण माहिती नोंदविली गेली आहे. या फीचरमुळे लसीकरणादरम्यान लोकांना काही त्रास सहन करावा लागणार नाही, असा सरकारचा विश्वास आहे.
ज्यांनी ऑनलाईन लसीकरणाचे स्लॉट बुक केले आहेत त्यांना कोविन पोर्टलवरून लसीकरणाचा संदेश मिळाला परंतु ते ठरलेल्या दिवशी लस घेण्यासाठी गेले नाहीत अशा प्रकारच्या यापूर्वी बर्याच तक्रारी आल्या. मात्र आता कोविन पोर्टलवर बुकिंग केल्यानंतर वापरकर्त्यांना एसएमएस मिळेल, ज्यात चार अंकी सुरक्षा कोड असेलच याशिवाय एक्नॉलेजमेंट स्लिपशिवाय हा कोडही उपलब्ध होईल. लोक हे स्लिप आपल्या फोनमध्ये सेव्ह करू शकतात.