गोंदियात विहिरीत गुदमरून चौघांचा मृत्यू

 

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्‍यामधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवीनच बांधण्यात आलेल्या विहिरीत वडील आणि मुलासह इतर दोघांचा गुदमरून मृत्यू झाला

आहे. या विहिरीचे गुरुवारी सकाळी पूजन करण्यात येणार होते. मात्र, विहिरीचे पूजन करण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.आत्माराम भांडारकर, झनकलाल भांडारकर, राजू भांडारकर आणि धनराज गायधने अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील आत्माराम भांडारकर यांनी आपल्या शेतात विहीर बांधलीहोती. या विहिरीचे गुरुवारी सकाळच्या सुमारास पूजन करण्यात येणार असल्याने बुधवारी सायंकाळीच भांडारकर यांनी विहिरीत तुरटी, ब्लिचिंग पावडर टाकली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी विहिरीतीलगढूळ पाणी बाहेर काढण्यासाठी पिता-पुत्र विहिरीत उतरले. मात्र, ते बाहेर परतलेच नाही. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी गावातील अन्य दोघेजण विहिरीत उतरले आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला.

या चौघांचाही विहिरीतील विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.