सलग चार सुट्ट्या अन्‌ दिवाळीमुळे चाकरमान्यांची गावाकडे धाव

पिंपरी  (प्रतिनिधी) – शनिवारपासून लागोपाठ सलग चार सुट्ट्या आल्यामुळे शहरातील चाकरमन्यांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीसाठी अनेकजण मुळगावी जात असल्याने गेली दोन दिवस वल्लभनगर आगार प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहे.

शुक्रवार (दि. 25) पासून दिवाळीला सुरुवात झाली. शनिवार, रविवार ही नेहमीची सुट्टी आणि सोमवार व मंगळवार ही दिपावली पाडवा आणि भाऊबीजेची सुट्टी आल्याने चाकरमन्यांनी दिवाळीसाठी गावाकडे जाण्याला पसंदी दिली आहे. कामधंद्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात रहिवाशी असलेले नागरिक गावाकडे जाण्यासाठी गर्दी करून लागल्याने वल्लभनगर आगार फुलून गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.