संग्रूर (पंजाब) : पंजाबच्या संग्रूर जिल्ह्यात लहानग्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मुलांना शाळेतून घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने चार विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या व्हॅनमध्ये 12 मुले होती. शेजारील शेतांत काम करणाऱ्या ग्रामस्थांनी आठ मुले पेटत्या गाडीतून बाहेर काढल्याने ती सुदैवाने बचावली. मृत बालकांमध्ये एका ती नवर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे.
व्हॅनने पेट घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र 1990च्या मॉडेलची ही अपघातग्रस्त मुले शाळेतून घरी परतत होती. ही सर्व मुले 10 ते 12 वयोगटातील होती. दरम्यान पोलिस घटनास्थळावर तातडीने दाखल झाले आहेत. त्यांनी आगीचे कारण शोधण्याचा तपास सुरू केला आहे.
कशाला पाठवली हो शाळेत!
या अपघातात मरण पावलेली एक कन्या तीन वर्षाची आहे. तिचा शाळेतील हा पहिलाच दिवस होता, तिच्या पालकांचा आक्रोश काळजाचे पाणी करणारा होता. कशाला पाठवली माझ्या मुलीला शाळेत असे म्हणत फोडलेला टाहो साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. तर अन्य दोन मृत मुले एकाच कुटुंबातील आहेत.
या धक्कादायक घटनेबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शोक व्यक्त केला आहे. यात दोषी असणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. संग्रूर येथून आतिशय दुख:द बातमी आली आहे. तेथे स्कूल व्हॅनने पेट घेतल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. दोषींना कठोर शासन केले जाईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.
या अपघातात बचवावलेल्या मुलांपैकी कोणालाही सरकारी रुग्णालयात दाखल करणण्यात आले नाही. त्यांचे पालक त्यांना घरी घेऊन गेले आहेत.
मोटारीची कालच खरेदी
पेटलेली मोटार हे 1990 चे मोडेलची होती. त्याला एलपीजी किट बसवलेला होता. गाडीने पेट घेतल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला, असे पोलिसांन सिांगितले. पंजाबचे शिक्षणमंत्री आणि संग्रूरचे आमदार विजय इंदर सिंगला यांनी दिलेल्या घटनास्थळावर माहितीनुसार सिमरन पब्लिक स्कूलने ही मोटार शुक्रवारीच खरेदी केली होती. या घटनेत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाख रूपये मदत जाहीर केली.
मुख्याध्यापक, मलाक आणि गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल
दरम्यान संग्रूरचे विभागीय उपायुक्त घन:शाम थोरी यांनी घटनास्थळाला भेट दिला. त्यांनी सांगितले की, शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन आणि मोटारीच्या चालकाविरूध्द पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हॅनची अवस्था मोडकळीला आली होती. ती बेकायदा अवस्थेत चालवली जात होती, असे जिल्हा वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. जर त्यांचे कार्यालयही यात दोषी आढळले तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.