४ मांजरींची नागासोबत झुंज, नील नितीन मुकेशने शेअर केला व्हिडिओ

मुंबई – अभिनेता नील नितीन मुकेशने त्याच्या इनस्टाग्रामवर चार मांजरी आणि एक नाग.. यांच्या झुंजीचा एक व्हिडिओ शूट करून शेअर केला आहे. शूटिंगदरम्यान त्याला सेटच्या परिसरात ही मांजरांची आणि नागोबाची लढाई पहायला मिळाली. या व्हिडीओतील नाग हा कोब्रा असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

Earlier in the day. Went for the BGM with @naman.n.mukesh for #BypassRoad , got down of the car and saw this.

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

दरम्यान या संदर्भात नील म्हणतो की ”बायपास रोड या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजर आणि नागाची झुंज पहायला मिळाली. कारमधून बाहेर पडलो आणि ते शूट केलं,” असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. चारही मांजरींना मात देत तो नाग कशाप्रकारे स्वत:ला वाचवतो हे या व्हिडीओत पहायला मिळत आहे. मात्र, यावर काही नेटकऱ्यांनी टीकासुद्धा केली आहे.

नीलने अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ शूट करण्यापेक्षा सर्पमित्राला बोलवण गरजेच होत अशी प्रतिक्रिया एकाने नोंदवली त्यावर नीलने त्या युजरला उत्तरदेखील दिल आहे, ‘सर्पमित्राला बोलावून नागाला योग्य ठिकाणी सोडण्यात आले आहे,’ असे त्याने युजरले सांगितले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला इन्स्टाग्रामवर ८० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)