पिंपरी, दि.२६ – वेगाने गाडी चालवतो असे म्हणत टोळक्याने चौघांना बेदम मारहाण केली. त्यात एकजण बेशुद्ध झाला असून त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.23) दुपारी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयासमोर घडली.शिवराज मंगेश जाधव, अशितोष बाळासाहेब पांडढवळे, निलेश चव्हाण, साद सय्यद अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. अशितोष बेशुद्ध आहे. याप्रकरणी शिवराज जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित माटे (वय 22) व त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्यांचा मित्र अशितोष हे डी. वाय. पाटील कॉलेज मधून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी आरोपी रोहितने फिर्यादीला अडवून गाडी हळू चालवता येत नाही का, माझा भाचा तुझ्या गाडीखाली आला असता असे म्हणत फिर्यादीला हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांचे मित्र निलेश चव्हाण व साद सय्यद तेथे आले. आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर रोहितने त्याचे आणखी साथीदार बोलावले. आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्र आशितोष यांना बांबूने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले तर आशितोष याच्या डोक्यात गंभीर ईजा झाल्याने तो बोशुद्ध पडला, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. याबाबत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.