कोल्हापूर – जिल्ह्यातील धरणं पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असून राधानगरी धरण 100 टक्के भरल्याने चार स्वयंचलित दरवाजे उघडले.
राधानगरी, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, घटप्रभा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. पावसामुळे राधानगरीसह जिल्ह्यातील 13 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने 32 बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.